डोंबिवलीत इलेक्ट्रॉनिक्स गोदामात आगीत सव्वा कोटीचे नुकसान
डोंबिवली – सारस्वत कॉलनी पंचायत बावडीजवळील राणा टॉवर येथे जे.के. एन्टरप्रायझेस मधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली .या आगिवार डोंबिवली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काही तासात नियंत्रण मिळवले आहे. गोदामाचे मालक अजय जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार गोदामामध्ये सुमारे सव्वा कोटी रुपयांचा माल असून त्यात एसी, फ्रिज, टी.व्ही, एलईडी टीव्ही संच, वॉशिंग मशिन ,ओवन ,मोबाइल, कंप्यूटर आदी महागड्या विद्युत उपकरणांचा समावेश होता. नेमकी आग कशामुळे लागली हे माहीत नसून नुकसान मात्र प्रचंड झाले असण्याची शक्यता असल्याचे जैन म्हणाले.
