डोंबिवलीत इमारत कोसळल्याची भीती

डोंबिवली दि.२९ – डोंबिवली पश्चिममधील साई प्रभात व साई लिला या शेजारी असणा-या अति धोकादायक इमारतीत ४८ कुटुंबे आपला जीव मुठीत घेऊन राहतात. या इमारतीच्या खांबांना आणि भिंतीना तडे गेले असून गुरुवारी इमारतीचे प्लास्टर कोसळयाने नागरिकांमध्ये भितीचे वातातवरण पसरले. इमारत कोसळण्याची भिती व घर मालकाची दादागिरी याने रहिवावशी त्रास्त झाले असून त्यानी ‘ह` प्रभाग अधिकार्याना तसे लेखी कळवले आहे.

गुरुवारी संध्याकाळी साई प्रभात या चार मजली इमारतीच्या एका बाजूचे प्लास्टर कोसळले. तर त्यापूर्वी चौथ्या मजल्यावरील एका रुमच्या हॉलचा मोठा स्लॅब आवाज करत कोसळला. त्यामध्ये दोन माणसे अडकली होती. त्यांना अग्निशमनदलाने बाहेर काढले. अशा स्थितीत नागरिक आपला जिव मुठीत घेऊन रहात असून घरमालक रहिवाशांशी गैरव्यवहार करते,पाणी अनियमित देण्यात येते,इमारत दुरुस्तीसाठी वर्गणी काढूनही इमारत दुरुस्त केली जात नाही,अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. प्रत्यक्ष या इमारतीची पहाणी केली असता इमारत अत्यंत धोकादायक झाली असून ती कधीही कोसळयाची भिती आहे. इमारतीच्या खांबाना तडे गेले असून भिंतीही खचल्या आहेत,गॅलरी स्लॅब कोसळले असून अशा भयानक अवस्थेत रहात असल्याचे नागरिक सांगतात.

यासदर्भात येथील रहिवाशी टीना सोलंखी व ज्येाती चौरसिया म्हणाल्या,घर मालकाला इमारत दुरुस्त करण्याची वांरवार विनंती केली घरमालकाने याकडे दुर्लक्ष केले अशी तक्रार केली. तर इमारतीचे मालक वामन म्हात्रे म्हणाले,महापालिकेचे अधिकारी येऊन गेले व त्यानी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगीतले असून येत्या एक दोन दिवसात ऑडिट होणार असून त्यानंतर इमारतीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे सांगितले असा दावाही त्यांनी केला. तर ‘ह ‘प्रभागाचे अधिकारी अरुण वानखेडे यांना विचारले असता त्यानी रहिवाशी जागा सेाडण्यास तयार नाही, इमारतीचे ऑडिट करण्यास सांगीतले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर इमारतीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email