डोंबिवलीत इनरव्हिल क्लब तर्फे जागतिक हृदय पुनरुथ्थानदिनाचे औचित्य साधून कार्यशाळा

अपघात, विजेचा शॉक, पाण्यात बुडणे,मानसिक आघात अशा अनेक कारणांनी कोणत्याही वयाच्या व्यक्तीचे हृदय काही काळ बंद पडू शकते. वेळीच उपाय न झाल्यास मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाल्याने मेंदूतील नाजूक मज्जातंतू आणि मज्जापेशी अपुऱ्या प्राणवायूमुळे कायमच्या मरण पावून जीवाला धोका संभवतो. अशा परिस्थितीत जीवदान देऊ शकणारी प्रथमोपचारपद्धती म्हणजे CPR (Cardiopulmonary Resuscitation)उर्फ कृत्रिम श्वासोच्छवास.

डोंबिवलीतील इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट या दोन संस्था एकत्रितपणे या CPR प्रथमोपचारपद्धतीची कार्यशाळा आयोजित करीत आहेत.उद्या,२३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ‘ हृदय पुनरुथ्थानदिन ‘ अर्थात , ‘ World restart a heart day ‘ असल्याने याचे औचित्य साधून इंडियन रिससीटेशन कौन्सिल आणि इंडियन सोसायटी ऑफ अनस्थिओलॉजिस्ट यांच्या सहकार्याने डोंबिवलीतील शुभमंगल हॉलमधे दुपारी १ ते ३ या वेळात तज्ञ प्रशिक्षितांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यशाळा आयोजित करीत आहेत.

मुंबई आणि नवी मुंबई वगळता हृदय पुनरुथ्थानाची प्रशिक्षण केंद्र उपनगरात नसल्याने अशा प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे

हे शिबीर विनामूल्य असून

आबालवृद्ध अशा सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांनी या जीवनरक्षक शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन इंनर व्हील क्लब चा वतीने करण्यातआले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email