डोंबिवलीत आरपीआयच्या दोन गटात हाणामारी ,जिल्हाध्यक्षाच्या पदावरून वाद

 डोंबिवली –  रिपब्लिकन  पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) गटाच्या कल्याण – डोंबिवली रिपाई झोपडपट्टी महासंघाने डोंबिवलीतील पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आण्णा रोकडे यांनी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांना पदावरून हटवा अशी मागणी केली. पत्रकार परिषद संपल्यानंतर जाधव यांनी स्टेजवर येऊन याचा जाब विचारला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. मात्र यावेळी पालिकेतील सुरक्षा रक्षक उशिरा आल्याने जवळपास १० ते १५ मिनिटे हाणामारी सुरु होती. सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
         पत्रकार परिषद संपल्यानंतर काही वेळात जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे स्टेजवर आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) गटाच्या कल्याण – डोंबिवली रिपाई झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिक उघडे यांना जाब विचारला. वाद झाल्यावर जाधव यांनी माणिक उघडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला भडकलेले कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी जाधव यांना या प्रकारचा जाब विचारला. महिला शहर अध्यक्षा वैशाली सावर्डेकर यांना जाधव यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकार १० ते १५ मिनिटे सुरु असताना पालिकेतील सुरक्षा रक्षक उशिरा आले. काही वेळ पालिकेत वातावरण तापले असताना रामनगर पोलीस घटनास्थळी आले. रोकडे आणि उघडे यांनी जाधव यांच्यावर आरोप केला असून त्यांनी या आरोपाचा इन्कार केला.मी कोणालाही मारहाण केली नाही, या पत्रकार परिषदेत डोंबिवली शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना का बोलावल गेले नाही असा प्रश्न उपस्थित केला. काही वेळाने सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात जाधव यांना नेण्यात आले. जाधव यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचे सावर्डेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email