डोंबिवलीतील १४ कवी थायलंडमधील कार्यक्रमात सादर करणार कविता ….

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१४ – अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि इंटरनेशनल कल्चरल अनड सोशल फोरम , मॉरिशस यांच्या संयुक्त विद्यमानाने १५ नोव्हेबर ते १९ नोव्हेबर पर्यत थायलंड येथील मॉडन बँकोक इंटरनशनल स्कूल, फोब मित्तर. सुकुमावीत, गटन नुआ येथे आयोजित केलेल्या कल्चरल कॉन्फरन्स कार्यक्रमात राज्यातून शिक्षक , साहित्यिक आणि कवी असे एकूण ४० जण जाणार आहेत. यात डोंबिवलीतील १४ कवींचा समावेश आहे. विशेष म्हणजे कॉन्फरन्सच्या अध्यक्षस्थानी डोंबिवलीतील जेष्ठ साहित्यिक डॉ. राम नेमाडे आणि ठाण्यातील प्राचार्य कवी संमेलनाचे अध्यक्षपदीही ज्योती परब हे भूषविणार आहेत. डोंबिवलीतील हेमंत नेहते यांच्या अक्षर आनंद दिवाळी अंकाचे प्रकाशनही यावेळी होणार आहे. कल्चरल कॉन्फरन्स कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनहि डोंबिवलीतील स्वनिल फडके करणार आहे.

प्रा.संगीता पाखले,प्रा.रेखा पुणतांबेकर,कल्पना गवरे, हार्दिका नेहते,लीलाधर महाजन,चंद्रशेखर भारती,आरती मुळे, नीता नेहते, जयश्री शेवडे, रिटा पाटील,कुसुम नेमाडे,प्रभाकर बाविस्कर शिंपी ,प्रकाश पाखले,लीलाधर तळले इत्यादी १४ कवी आपल्या कविता या कल्चरल कॉन्फरन्स कार्यक्रमातील कविता संमेलनात सादर करणार आहेत. कल्चरल कॉन्फरन्समध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आदी होणार आहे. तसेच विशेष आकर्षण म्हणून कटपुतलीचा शो अर्थात पपेट शोहि डोंबिवलीतील कल्पना गवरे, मकरंद गोंधळी आणि साक्षी परब सादर करणार आहेत. यावेळी उद्घाटन सीइओ इंडिया चॅनलचे अध्यक्ष डॉ. शंकर राज परब यांच्या हस्ते होणार आहे.

प्रमुख म्हणून म्हणून उदोजग दिनेश क्षीरसागर आणि एम.आय.एस.बॅंकॉक स्कूलचे प्रिन्सिपल डॉमिनिक देशमीर उपस्थीत राहणार आहेत.या कल्चरल कॉन्फरन्स कार्यक्रमाचे आयोजन डॉ.योगेश जोशी, हेमंत नेहते आणि दिलीप ठाणेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमात जळगाव, धुळे, कोल्हापूर, रायगड आणि ठाणे येथील साहित्यिक कवी असे एकूण ४० कवींची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष भिवंडीतील नामदेव पाटील करणार आहेत. या कार्यक्रमातमहाराष्ट्रातील १० निवडक व्यक्तींचा प्राईड ऑफ नेशन पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email