डोंबिवलीतील रस्ता गेला चोरीला …

(श्रीराम कांदू)

दोन – तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डोंबिवलीतील बस थांबा चोरीला गेल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकणात कोणाला अटक करावी असा प्रश्न पोलिसांना पडला होता. आता कॉंग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी पूर्वेकडील आयरे गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पालिका आयुक्त पी. वेलूरासु यांच्याविरोधात याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पूर्वेकडील प्रभाग क्र.६६ आयरे गावातील स्मशानभूमी परिसरात रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र सदर रस्ता खोदला गेल्याने सदर काम निष्क्रियपद्धतीने सुरु असून या कामाचा नागरिकांना त्रास होत आहे. रस्ता बनविण्याऐवजी या रस्त्यावरील माती चोरली जात आहे. अश्या या कामामुळे गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताहि बंद झाला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारसाठी दुसऱ्या स्मशानभूमीला जावे लागत आहे. आता रस्ता नसल्याने नेमका रस्ता कुठे गेला ? रस्ता चोरीला गेला का ? असा प्रश्न कॉंग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील यांना पडला आहे. या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत येथील रस्ता चोरीलागेला असा आरोप पाटील यांनी केला आहे. पालिका आयुक्त पी. वेलूरासु यांना जबाबदार ठरवत त्यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर `ग` प्रभाग क्षेत्र अध्यक्षा अलका म्हात्रे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करू असे सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email