डोंबिवलीतील मॅरेथॉन स्पर्धेत ६५०० स्पर्धक धावले
Hits: 0
डोंबिवली दि.२० :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शहर शाखेने आयोजित केलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे 6500 स्पर्धकांनी भाग घेतला. रविवारी भल्या पहाटे वय वर्ष 5 पासून ज्येष्ठ नागरिकांनी इंदिरा चौकात गर्दी केली होती. स्त्री व पुरुष आशा दोन्ही 9 – 9 गटात ही स्पर्धा झाली. थंडीची पर्वा न करता शेकडो स्पर्धकांनी यात भाग घेतला. महापौर विनिता राणे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ केला.
हेही वाचा :- Dombivali ; पूर्ववैमनस्यातून बहीण-भावावर हल्ला
इंदिरा चौकापासून ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यंग मुलांनी पण या स्पर्धेत भाग घेतला होता. तर ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे ,शहर प्रमुख राजेश मोरे, ठाणे जिल्हा महिला संघटक लता पाटील, सभापती वीणा जाधव, नगरसेवक सहभागी झाले होते स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संतोष चव्हाण ,विवेक खामकर, सुधीर उर्फ भैय्यासाहेब पाटील, सतीश मोडक, विजय देशमुख आदींनी मेहनत घेतली.