डोंबिवलीतील मानपाडा जिल्हा परिषदेच्या शाळेला जिल्हास्तरीय गुणदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक …

डोंबिवलीतील मानपाडा जिल्हा परिषदेच्या शाळेला जिल्हास्तरीय गुणदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक …

शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आधारित ` आयुष्याची लढाई ` एकाकिंका ….  

(श्रीराम कांदु)

 डोंबिवली- जिल्हा परिषद ठाणे ,शिक्षण विभाग आणि प्राथमिक जिल्हास्तरीय गुणदर्शन स्पर्धेत डोंबिवलीतील मानपाडा जिल्हा परिषदेच्या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आधारित एकाकिंका या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केली. स्पर्धेत प्रथमच अश्या प्रकारचा विषय आल्याने जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी शाळेत या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

   बदलापूर येथील पोतदार इंटरनॅशनल शाळेत पार पडलेल्या या स्पर्धेत शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एकाकिंका सादर केली .या स्पर्धेत कल्याण तालुक्यातून १०२ शाळामध्ये डोंबिवलीतील मानपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आधारित `आयुष्याची लढाई ` या एकाकिंकेला प्रथक क्रमांक मिळाला आहे. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमणराव, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  सुभाष पवार, जिल्हाशिक्षणाधिकारी मीना शेंडे आदि मान्यवरांच्या हस्ते शाळेला चषक देण्यात आले. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक कमलाकर बागवे हे या शाळेचे शिक्षक असून रोहन देसाई, प्रिया शिंदे, वेदिका पांचाळ, सानीकुमार यादव यासह आणखी सहा विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अहिरे यांच्यासह झुंजारराव , कळापुरकर, आव्हाड, मोंडकर, चौधरी आणि गायकवाड यांनी अथक मेहनत घेतली.जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य रमेश पाटील यांनी शाळेत या विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करताना त्यांचा भेटवस्तू दिल्या. पाटील म्हणाले, या शाळेतील विद्यार्थ्यांनी डोंबिवली आणि जिल्हा परिषद शाळेचे नाव मोठे केले आहे. तर लेखक कमलाकर बागवे म्हणाले, शेतकऱ्याचे आणि प्राण्याचे नाते घट्ट असते. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्येचा पर्याय निवडतो. मात्र त्याची बैलाशी असलेली बांधिलकीचा विसर पडल्याने हा बैल शेतकऱ्याला जगण्याची नवी अशा देतो. नी  शेतकरी आत्महत्येचा विचार सोडून देतो` असा हा एकाकिंकेचा विषय आहे. या शाळेला प्रथक क्रमांक मिळाल्याने गावकऱ्यानी कौतुक करत गावात मिरवणूक काढली. व्यवसायिक नाट्यलेखक प्रवीण शांताराम आणि सचिन कांबळे यांनी या या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email