डोंबिवलीतील फडके पथावर नाल्यातील मैला टाकल्याने दुर्गंधी 

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – पावसामुळे याच्या तोंंडावर डोंबिवलीत नाले सफाईला सुरवात करण्यात आली असून येथील प्रिसध्द फडके पथावर गेले चार दिवस नाल्यातील गाळ,मैला काढून फुटपाथवर तसाच टाकण्यात येत असल्याने सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण असून व्यापारी,नागरिक नाक मुठीत धरुनच वाटचाल करत आहेत.
पावसाळयात नाले,गटारे तुंबु नयेत म्हणून पावसाळयापूर्वी नाले सफाई केली जाते सध्या डोंबिवलीत अंतर्गत नाले सफाई सुरु असून त्यातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे कर्मचारी नाल्यातील गाळ,मैला तसाच फुटपाथवर टाकतात यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे दुकानदार,नागरिक यांनी सांगीतले की या भागातील स्थानिक नगरसेवक सांगूनही लक्ष देण्यास तयार नाही.फडके पथ हा व्यापारी मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो,अशा मुख्य रस्त्याच्या बाजूला सर्व मैला टाकण्कयात आला आहे मॉडर्न हॉटेल पासून बाजी प्रभु चौकापर्यतच्या भाागात ठिकठिकाणी गाळ,मैला टाकण्यात आला आहे ती घाण तीन दिवस झाले तरी उचलली जात नाही अशी तक्रार नागरिकांनी केली.येथील एक जागृत नागरिक श्रीकृष्ण भुरे यांनीही तीव्र संताप सोशल मिडीयावर व्यक्त केला असून दुकानदारांना उदबत्तीचे पुडे जाळुन व्यवसाय करावा लागत आहे सफाई कर्मचारी किंवा स्थानिक नगरसेवक याना लक्ष देण्यास वेळ नाही व निगरग‌‌ प्रशासन वेळाेवेळी बॅॅनर लावणारे आता कुठे गेले असा सवाल त्यानी केला आहे.
या संदर्भात स्थायीसमितीचे सभापती राहुल दामले यांना विचारले असता त्यानी या कडे तातडीने लक्ष देण्याचे मान्य केले व सर्व गाळ,मैला त्वरित उचलण्यात येईल असे सांगीतले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email