डोंबिवलीतील प्रल्हाद म्हात्रेंची “किक बॉक्सिंग” खेळाडूला आर्थिक मदत

दानशूर प्रल्हाद म्हात्रेंनी पुढे केला आर्थिक मदतीचा हात,

वर्षभर स्पर्धेसाठी लागणारा आर्थिक भार  म्हात्रे उचलणार

डोंबिवली – खेळाची आवड मात्र आर्थिक परीस्थिती बेताची असूनही “किक बॉक्सिंग खेळात डोंबिवलीचे नाव मोठे करण्याचे निश्चय करणाऱ्या अक्षय गायकवाडला डोंबिवलीतील दानशूर प्रल्हाद म्हात्रेंनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी गायकवाड याचे एक वर्षाचे आर्थिक पालकत्व घेतले आहे. अक्षयला वर्षभर स्पर्धेसाठी लागणारा आर्थिक भार स्वतः म्हात्रे उचलणार असुन त्या प्रित्यर्थ पहिल्या खर्चाचा धनादेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अक्षयला दिला.

  पश्चिमकडील गायकवाडवाडी येथील अक्षय बळीराम गायकवाड याला किक बॉक्सिंग खेळात प्राविण्य मिळवायचे आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगीरी करायची आहे. परंतु अक्षयची परिस्थिती बेताचीच आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी प्रल्हाद म्हात्रे यांची भेट घेवून त्यांच्याकडे आपली समस्या मांडली. परंतु काही कारणास्तव म्हात्रे यांना समस्या सोडविणे शक्य झाले नाही. दरम्यान एका कार्यक्रमात अक्षयच्या सत्कार सोहळ्याचे साक्षीदार स्वतः प्रल्हाद म्हात्रे असल्याने त्यांनी निर्णय घेतला कि, “कीक बॉक्सिंग” मध्ये करियर करू पाहणाऱ्या अक्षयचे वर्षभराचे पालकत्व घ्यायचे. अक्षय गायकवाड याने “कीक बॉक्सिंग” स्पर्धेत अहमदनगर राज्यस्तरीय स्पर्धेत २०१६ रोजी कास्यपदक, दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक, आंतरराष्ट्रीय कीक बॉक्सिंग सेमिनार व राष्ट्रीय संघ निवडीमध्ये २०१७ रोजी सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच तुर्कमोनिस्तान येथे एशियन कीक बॉक्सिंग स्पर्धेत २०१६-१७ मध्ये कास्यपदक मिळविले आहे. त्याने कल्याण खडकपाडा येथील मोहनप्लनेट मधील मोहनसिंग सर,बोमार्शल आर्ट क्लासमधील संजय कतोड यांच्याकडे कीक बॉक्सिंगचे आद्ययावत प्रशिक्षण सुरु आहे. तसेच माझ्या या खेळासाठी आजोबा, आई, वडील यांच्यासह प्रल्हाद म्हात्रे यांचा प्रत्यक्ष पाठींबा असल्याचे अक्षय सांगतो. तर प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले कि, तो मेहनती असून त्यांनी त्याला झेपेल तेवढे प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे अक्षयने कीक बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपली शारीरिक क्षमता व आत्मविश्वास या जोरावर स्पर्धेत सहभागी व्हावे असा वडिलकीचा सल्लाही दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email