डोंबिवलीतील त्या 72 कुटुंबांचे अखेर बीएसयूपीत तात्पुरते स्थलांतर
(श्रीराम कांदु )
इमारत खचल्यामुळे रातोरात रस्त्यावर आलेल्या डोंबिवलीच्या नागुबाई इमरतीतील रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कचोरे येथे महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या बीएसयूपी प्रकल्पातील घरे या कुटुंबांसाठी उघडी करण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या घरांच्या चाव्या या कुटुंबाना देण्यात आल्या.
डोंबिवली पूर्वेतील नागुबाई निवास नावाची इमारत गेल्या आठवड्यात खचल्याने याठिकाणी राहणारी 72 कुटुंबे एका रात्रीत रस्त्यावर आली होती. त्यांचा विचार करून या कुटुंबांना किमान बीएसयूपीच्या घरांमध्ये राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शासनाकडे केली होती. त्यानूसार नगरविकास खात्याने या मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे. नगरविकास खात्याने यासंदर्भातील एक पत्र नुकतेच पालिका आयुक्तांना पाठवले आहे. त्यामध्ये या 72 कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात याइमारतींमध्ये राहण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानूसार विकास प्रकल्पातील बाधितांना आणि धोकादायक इमारतीमधील कुटुंबाना संक्रमण शिबिर बीएसयूपीतील घरं तात्पुरत्या स्वरूपास देण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
Please follow and like us: