डोंबिवलीतील जुन्या पुलाची पाहणी अधिकारी आणि ठेकेदारांची कानउघडणी….
डोंबिवली दि.२२ – मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक संजय जैन व इतर अधिकारी तातडीने डोंबिवलीत आले व रेल्वे स्थानकाची कसून पहाणी केली. रेल्वे हदीतील स्चच्छतेबदल त्यांनी अधिकारी व ठेकेदारांची चांगलीच कानउघडी करुन त्यांना कालबध्द कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यानी डोंबिवली रेल्वे स्थानकातील व ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पूलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून येत्या जून पर्यत हे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला.
मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक संजय जैन साधारण पावणे अकरा वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरले त्याचे स्वागत डोंबिली स्थानकाचे प्रबंधक के. ओ. अब्रहाम व इतर अभियत्यांनी त्याचे स्वागत केले रेल्वे प्रबंधक येणार म्हणून संपूर्ण रेल्वे स्थानक स्वच्छ करण्यात आले होते मात्र फलाटांची पहाणी न करता त्यानी रेल्वे हदीतील इतर परिसराची पहाणी केली.
ब्रिजखाली फेरीवाल्यांचा कचरा साठला होता. अनेक ठिकाणी वायर्स निघाल्या होत्या ,मातीचे ढिगारे साठले होते हे सर्व कालबध्द कार्यक्रम ठरवून स्टेशन परिसर सुंदर करण्याच्या सूचना दिल्या. जे कर्मचारी नीट काम करत नाहीत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. ठेकेदार व अधिका-याची झाडाझडती घेताना त्यांनी मला ताजमहाल बनवायच्या नाहीत पण प्रवाशांच्या सोईसाठी सर्व काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे दोन स्टेशनाची पाहाणी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय जैन म्हणाले, येत्या २ ऑकटोबंरपर्यत रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ व सुंदर करायचा आहे काही सुधारणा झाल्या आहेत,होत आहेत मात्र ‘दिल मांगे मोर ‘अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवली स्टेशन परिसर सुंदर करण्यासाठी ३८ कामगार,७ मशिन व ३ सुपरवाझर नेमण्यात आले असून त्यांना कालबध्द योजना तयार करण्यास सांगितले आहे. रेल्वे स्थानकावर येण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज आहे यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले व महापालिकेने रस्ते चांगले करावे अशी अपेक्षा केली.