डोंबिवलीतील जनता दरबारात उपायुक्तांची दांडी
डोंबिवलीतील जनता दरबारात उपायुक्तांची दांडी …
डोंबिवली :-
सोमवारी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात जनता दरबारात उपायुक्त हजर नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत परत जाणे पसंत केले. नागरिकांसाठी उपायुक्तांनी जनता दरबारात आले पाहिजे असे नागीकांचे म्हणणे आहे. उपायुक्तांच्या जागी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला बसविण्यात आले होते. अनेक तक्रारी घेऊन आलेल्या डोंबिवलीकरांना आपल्या तक्रारीचे निरसन होणार कि नाही असा प्रश्न पडला आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामे , प्रभागातील समस्या याबाबत चर्चा करून यावर उपायोजना काढण्याचे काम जनता दरबारात केले जाते. डोंबिवलीतील पालीकेच्या विभागीय कार्यालयात दर आठवड्याला जनता दरबार भरविला जातो. मात्र सोमवारी जनता दरबारात आपल्या तक्रारी घेऊन आलेल्या डोंबिवलीकरांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास उपायुक्त सु. रा. पवार उपस्थित नव्हते. त्याच्या जागी प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे नागरिकांच्या तक्रारी एकत होते. मात्र उपायुक्त नसल्याने त्यामुळे काही नागरिकांना या दरबारात निराश होऊन परत यावे लागले. आपली तक्रार घेऊन आलेल्या भारत गोळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले , आम्ही सामान्य नागरिक आहोत. जर उपायुक्तांना काही कारणास्तव येणे जमणार नव्हते तर तसे त्यांनी सांगायला हवे होते. त्याच्या जागी एक अधिकाऱ्याला बसले होते.