डोंबिवलीतील कराटेपटू देवेश पाटीलची देशसेवेसाठी भरतीय सैन्यात भरती होण्याची इच्छा 

ऐषोआरामी जीवनाकडे पाठ फिरवुन सैन्यात भरती होउन देशसेवा करण्याच्या इच्छेबद्दल सर्वत्र होतयं कौतुक
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – टीव्हीवर पाहिलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्यात  भारतीय सैन्याने केलेल्या लक्षणीय कामगिरीचा ठसा बालमनावर उमटलेल्या कराटेपटू देवेश पाटील याने भारतीय सैन्यात भरती होण्याचा मानस व्यक्त केला आहे.  देवेशला देशसेवा करण्याचा त्याचा मनोदय  असून  शालेय वयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व काश्य पदके पटकाविली आहेत. देवेश याचे काॅरपोरेट ऐषोआरामी जीवनाकडे पाठ फिरवुन सैन्यात भरती होउन देशसेवा करण्याच्या इच्छेबद्दल सगळीकडे कौतुक होत आहे.
    देवेश पाटील हा डोंबिवली येथील  मानपाडा येथे राहतो. सध्या तो न्यु केंब्रिज स्कुल मध्ये शिकतो.गेल्या चार वर्षापासून शोटोकाँन कराटे इंडिया असोशिएशन या कराटे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत शिक्षण घेत आहे.विनोदकुमार वर्मा व देवधर दाभोलकर या प्रक्षिकाकडून कराटेचे अध्यावत प्रशिक्षण देवेश यास मिळत आहे. लहान वयातच देवेश याने चमकदार कामगिरी करुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केली आहे. नेपाल, भुतान, श्रीलंका, मलेशिया यादेशात व दिल्ली ,पंजाब, येथे १२ सुवर्ण, ८ रौप्य ८ काश्य पदांचा मानकरी ठरला आहे. आरती इंडस्ट्रीने देवेशला वेळोवेळी मदत केल्याचे त्याचे वडील गुरुनाथ यांनी सांगितले. कराटेचे प्रशिक्षण घेण्यासाठी तून शाळेतून देवेशला प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षक गणेश निकम करीत असतात. वडील गुरुनाथ पाटील  आरती इंडस्ट्री त काम करतात तर आईगृहिणी आहे. उभयताना आपल्या मुलाच्या इच्छेबद्दल अभिमान वाटतो. देवेशच्या प्रशिक्षणात सहाय्य मिळावे यासाठी अनेक जण मदत करतात. त्याबाबतत्याचे आइवडील कृतज्ञता व्यक्त करतात.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email