डोंबिवली येथील औद्योगिक भूखंडांवरील ३०० अनधिकृत बांधकामे रडारावर ? १८ मे पासून कारवाई होणार
(श्रीराम कांदु)
डोंबिवली-औद्योगिक विकास मंडल आता जागे झाले आहे या भागात मोैठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून अद्यापही ती खुलेपणाने सुरु आहेत पण आता शासनाने अध्यादेश काढून औद्योगिक विकास मंडळाच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे निष्काशित करण्याचे निर्देश दिल्याने आता डोंबिवली औद्योगिक विकास मंडळाच्या भूखंडावरील सुमारे ३०० अनधिकृत बांधकामे मंडळाच्या रडारावर असून येत्या १८ मे पासून अनधिकृत बांधकामे निष्काशित करण्यात येत असून तशा नोटीसा बजावण्यात आल्या असून तगडा पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला आहे.
आजदे,सागाव,सोनारपाडा,चोळे,गजबंधन पार्थली,गोळवली इत्यादि गावठाण हददीत औद्योगिक क्षेत्र विकसित केले आहे.औद्योगिक क्षेत्राच्या विकासामुळे गावठणजवळ हददीत चाळींचे व कालांतराने टप्प्या-टप्प्याने बहुमजली इमारतीत रुपांतर झाले आहे.मंडळाने संपादित केलेल्या जागांवर अनधिकृत बांधकामे अनधिकृतपणे नोंदणी करण्यात येत असून आर सी सी दर्जाच्या इमारती नियम न पाळता घाई-घाईने बांधण्यात येत असल्याचे मंडळाच्या लक्षात आले आहे.या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याचे प्रयत्न मंडळाने चालु केले असून राज्य शासनानेही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मानपाडा चौक ते शिवाजी उद्योग नगर येथील बर्फ कारखाना पर्यतच्या रस्त्यावरील उजवी बाजू,काही भाग गावठाण आणि शिवम हॉस्पिटल ते जिमखांना रोड आजदे ,सागर्ली,पर्यतच्या भागात मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली असून अजूनही ते काम सुरु आहे अशी सुमारे ३०० अनधिकृत बांधकामे मंडळाच्या रडारावर असून टप्प्या-टप्प्याने ती बांधकामे निष्काशित करण्यात येणार आहेत.येत्या १८ मे पासून अनधिकृत बांधकामे निष्काशित करण्यात येत असून सुरवातीला वसंत पाटील,सागाव गावठाण,मनोज ख्ंडेलवाल आजदे गावठाण,मोहन पाटील व बाळाराम पाटील सागाव गावठाण,हेमंत दरे व चद्रकात साळवे आजदे गावठाण यांना मंडळाने नेाटीस दिली असून ही यांची अनधिकृत बांधकामे निष्काशित करण्यात येणार आहेत १८ मे पासून पुढील २५ दिवसांसाठी १०० पोलीस कर्मचा-यांचा बदोबस्त पोलीस उपायुक्तांकडे मागितला असून त्याचे नियमाप्रमाणे पैसे देण्याची तयारी दर्शवली आहे.या यासंदर्भात औद्योगिक विभागातील अधिका-यांकडे चौकशी केली असता त्यानी याला दुजोरा दिला मात्र नाव न छपण्याची विनंती केली.त्यामुळे ऐन पावसाळयाच्या तोडावर मंडळ खरंच काही कारवाई करणार की आरंभशूर ठरणार ते आता येत्या काळातचं कळणार आहे.