डोंबिवलीतील इंदिरा चौकात परिवहन बस पार्किंग… परिवहन बसेसवर वाहतूक पोलीस कारवाई करणार ?

डोंबिवलीतील इंदिरा चौकात परिवहन बस पार्किंग…
परिवहन बसेसवर वाहतूक पोलीस कारवाई करणार ?

डोंबिवली :- दि.०७ ( प्रतिनिधी ) डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील इंदिरा चौकात वाहतूक कोंडीला अनधिकृत रिक्षा थांबे जबाबदार असताना आता परिवहन बसेससुद्धा इंदिरा चौकात पार्किंग केल्या जातात. वाहतूक पोलीस या चौकातील रिक्षा चालकांवर कारवाई करणार असतील तर वाहतूक कोंडी करण्यात भर घालणाऱ्या परिवहन बसेसवर कारवाई होईल का असा प्रश्न डोंबिवलीकरांनी उपस्थित केला आहे.
इंदिरा चौकात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास आणि कामाचा वेळ खर्ची होत आहे. वाहतूक कोंडीच्या या समस्येमुळे मुंबई जाणाऱ्या व येणाऱ्या चाकरमान्यांना सकाळ-संध्याकाळी घर गाठण्यास खूप त्रास सहन करावा लागत आहे इंदिरा चौकात आठ रिक्षा थांबे असून मानपाडा, लोढा, पलावा, गांधीनगर, पी अँड टी, गोग्रासवाडी, सोनारपाडा, सागर्ली, खंबालपाडा, गोळवली, टाटा,सूचक, कल्याण आदी ठिकाणी रिक्षा धावतात. तर इंदिरा चौकातून परिवहन सेवेची वाहतूकही भोपर, नवनीतनगर, दावडी, निवासी, हेदुटणे, खोणी, पनवेल, पश्चिमकडील कोपर, मोठागाव, पश्चिम रिंग सेवा, न्यू आयरे, लोढा आदी मार्गारवर बस सेवा आहे. मात्र बस स्थानकांचा ताबा रिक्षा चालकांनी घेतल्याने बस कोणत्या ठिकाणी लावायच्या हा प्रश्न चालकांना पडला आहे. त्यामुळे या चौकात जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी बस पार्किंग केली जाते. आहेत बस वाहतूक नियंत्रण प्रभारी यशवंत बोरळे यांनी चालक जबाबदार आहेत असे स्पष्ट सांगितले. परंतु रिक्षा आणि बस चालकांच्या अनागोंदी कारभारामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. असे असले तरी वाहतूक नियंत्रण पोलीस वाहतूक कोंडीबाबत डोळ्यावर पट्टीबांधून दुर्लक्ष करीत आहे/ वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभाग , रिक्षा युनियन, परीवहन अधिकारी, वाहतूक नियंत्रण पोलीस, लोकप्रतिनिधी यांच्यात अनेक वेळा सामंजस्य भूमिकेने अनेक वेळा चर्चा झाल्या त्याचा काहीही फरक पडत नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email