डोंबिवलीतील आयरे गावातील खदानीत बुडून ११ वर्षीय बालकाचा मृत्यू
( श्रीराम कांदु )
डोंबिवली :- दि. १४ ( प्रतिनिधी ) डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावातील खदानीत पाय घसरून पाण्यात बुडून एका ११ वर्षीय बालकाचा मृत्यूझाल्याची घटना शनिवारी दुपारच्या दरम्यान घडली. तब्ब्ल दिड तास खदानीत अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतल्यानंतर बालकाचा मृतदेह सापडला.
इकारार हुसैन असे मृत बालकाचे नाव आहे. किल्ले बनवण्यसाठी गावातल्या खदानीजवळ माती काढून झाल्यावर मातीने माखलेले हात धुण्यासाठी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खदानीच्या किनारी जाऊन हात धूत असताना या बालकाचा पाय घसरून पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या खदानीपर्यत येण्यासाठी अग्निशमक दलाच्या गाडीला खूप अडचणी आल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ता शाम गौड यांनी सांगितले. त्यामुळे अग्निशमक दलाच्या जवानाना पायी चालत घटनास्थळी जावे लागले
Please follow and like us: