डोंबिवलीतील आधारकार्ड केंद्र बंद झाल्याने शिवसेना भाजपवर नागरिक नाराज ; नागरिकांनी घातला गोंधळ

 डोंबिवली-  आधारकार्ड काढणे बंधकारक असल्याने प्रत्येक नागरिक आधारकार्ड काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने सुरु केलेले आधारकार्ड बंद केंद्र झाल्याने नागरिकांनी या दोन्ही पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेने डोंबिवलीतील  मध्यवर्ती शाखेत सुरु केलेले आधारकार्ड केंद्र पाच दिवसात बंद झाले. तर काही दिवसांपूर्वी मोठ्या गाजावाजा करत भाजपाने सुरु केलेले डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात आधारकार्ड केंद्र बुधवारी झालेल्या वादामुळे बंद झाले. मात्र कोणतीही सूचना दिली नसल्याने आधारकार्ड केंद्र दिसल्याचे पाहून गुरुवारी सकाळी नागरिकांनी गोंधळ घालता होता.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेने मध्यवर्ती शाखेत आधारकार्ड केंद्र सुरु केले होते. मात्र तांत्रिक बिघाडमुळे हे आधारकार्ड केंद्र बंद करावे लागले. तर डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात सुरु झालेले आधारकार्डहि यांचा कारणामुळे बंद झाल्याचे केंद्रचालक कैलाश डोंगरे यांनी सांगितले. मात्र यात नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. एकीकडे हे केंद्र सुरु करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे बुधवारी या केंद्रावर झालेल्या वादामुळे तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करून गुरुवारी पालिकेतील हे केंद्र बंद ठेवले आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सध्या आधारकार्ड केंद्र सुरु करण्याची गरज असताना सदर केंद्र बंद झाल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहे. अचानक हे पालिकेतील आधारकार्ड केंद्र बंद झाल्याने गुरुवारी या केंद्रावर आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला.  मनसेने जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी यासंदर्भात भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप म्हणजे फक्त घोषणांचा पाऊस … आधारकार्ड केंद्र हे केवळ काही दिवसांपुरते सुरु होते. आता ते बंद झाल्याने जनतेला सर्व समजले आहे. तर आधार कार्ड केंद्र लवकर सुरु होईल असे केंद्रचालक डोंगरे यांनी सांगितले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email