डोंबिवलीतील अतिधोकादायक विश्वदिप इमारत पाडण्याचे काम सुरु
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१४ – डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनलगत असलेल्या पाटकर पथावरील सुमारे ५० वर्षापूर्वीची अतिधोकादायक झालेली ‘विश्वदिप’इमारत पाडण्याचे आदेश कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार गुरुवारपासून ही कारवाई सुरु करण्यात आली. हे काम २५ तारखेपर्यत चालणार आहे. यासाठी बाजीप्रभुचौक व पाटकर रोड अर्धा बंद करण्यात आला आहे. या इमारतीचा चौथा, तिसरा आणि दुसरा मजला कमी करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या इमारतीच्याजवळून पायी चालत असताना एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यिनी आकांक्षा पोस्ट हिच्या डोक्यावर चौथ्या मजल्यावरील तुटलेल्या अवस्थेतील खिडकी पडली. यात ती गंभीर जखमी झाली होती.
विश्वदिप इमारत चार मजली असून पालिकेने यापूर्वीच वांरवार धोकादायक म्हणून जाहीर केली होती यापूर्वी दोन वेळा इमारतीच्या खिडकीचा काही भाग पडला होता. तळ अधिक चार मजली इमारत असून तळ मजल्यावर १५ दुकाने असून त्यानी कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता काल न्यायालयाने तळ व पहिला मजला सोडून दुसरा, तिसरा व चौथा मजला पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवार पासून कारवाई सुरु करण्यात आली असून अतिधोकादायक इमारत असल्याने टप्प्या–टप्प्याने पाडण्यात येत असल्याचे प्रभाग अधिकारी भरत पाटील यांनी सांगीतले. ही इमारत अनिल वाघाडकर यांच्या मालकीची असून त्यांनी पालिकेनेच इमारत पाडून टाकावी म्हणून मागणी केली होती. बहुसख्य इमारत रिकामी असून केवळ तळ मजल्यावर दुकाने आहेत. शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी या इमारतीवर लवकरात लवकर कारवाई होण्यासंदर्भात `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी अमित पंडित यांना २८ जून २०१८ रोजी पत्र दिले होते. याबाबत नाईक यांना विचारले असता ते म्हणाले,वास्तविक यापूर्वीचा इमारतीवर कारवाई होणे आवश्यक होते.