डोंबिवलीचे ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे निधन

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.28 – मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार करणारे ग्रंथ प्रसारक शरद जोशी यांचे गुरुवारी दुपारी अल्प आजाराने डोंबिवली येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.”लोकसत्तेचेप्रतिनिधी शेखर जोशी यांचे ते वडील होते

स्वत ग्रंथविक्रेते किंवा प्रकाशक नसतानाही केवळ मराठी साहित्य आणि पुस्तकांच्या प्रेमापोटी उत्तमोत्तम आणि दर्जेदार मराठी पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने शरद जोशी हे गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहेत. आज वयाच्या 83 व्या वर्षीही त्यांचे हे काम उत्साहाने सुरू होते ग्रंथप्रसारक शरद जोशी अशी त्यांची ओळख आहे.

पत्रव्यवहारातून ग्रंथप्रसार आणि प्रचार हे त्यांचे वैशिष्ट्य. आपल्या पदराला खार लावून आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांचे हे ग्रंथप्रचार आणि प्रसाराचे काम सुरू आहे. या निमित्ताने त्यांनी आजवर सुमारे पन्नास हजार पत्रे लिहिली आहेत.

पत्रलेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रातून मराठी साहित्य, लेखक, प्रकाशक तसेच एकूणच ग्रंथव्यवहाविषयी आलेले माहितीपूर्ण लेख, बातम्यांच्या झेरॉक्स कॉपी काढून त्याही मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींमध्ये वाटणे, चांगली पुस्तके लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रसंगी ओळखीच्या मंडळींकडे जाणे, त्यांना पुस्तकांविषयी माहिती देणे, ही पुस्तके त्यांनी विकत घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आदी कामेही एकीकडे सुरुच असतात. महाराष्टातून प्रसिद्ध होणारी लहान मासिके, साप्ताहिके यांना ते सातत्याने नवीन मराठी पुस्तके, मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाचे वृत्त, निवडक पुस्तकांची ओळख करून देणारे स्फूट लेखन पाठवत असतात. अनेकवेळा ग्रंथप्रसाराबाबत पत्रके प्रसिद्ध करून ती विविध संस्था, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांना पाठवतात तर मोठ्या समारंभातूनही ही पत्रके वाटतात. एक होता काव्हर्र, डॉ. आल्बर्ट श्वाईट्झर, शापित यक्ष, प्रकाशाची सावली आणि अन्य अनेक पुस्तकांचा त्यांनी धडाडीने प्रचार-प्रसार केला आहे.
सायंकाळी त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email