डोंबिवलीकर प्रवाश्यांनी लोकल दरवाज्यांच्या खांबांना ग्रीप बसविण्याची मागणी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०५ – मध्य रेल्वेच्या ताफ्यात असणाऱ्या लोकलच्या दरवाजामधील लोखंडी खांबांना ग्रीप (पकड) बसवण्याची मागणी डोंबिवलीकर प्रवाश्यांनी केली आहे. लोकलमधील खांबांना नसलेल्या ग्रीपमुळे गर्दीच्या वेळी दोन- तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीतील भावेश नकाते या तरुणांचा मृत्यू झाला होता. प्रवासी पडून अपघात होऊ शकतात, ही बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्याची राज ठाकरे यांनी तातडीने दाखल घेत मनसेच्या रेल्वे कामगार सेनेला यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यास सांगितले. त्यानुसार मनसे रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस जितेंद्र पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवत लवकरात लवकर लोकलच्या दरवाजातील लोखंडी खांबाला ग्रीप बसवण्याची मागणी केली आहे. सर्वाधिक गर्दीचे स्टेशन अशी ओळख असलेल्या डोंबिवली स्थानकातून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा दरवाजातून पडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकर प्रवाश्यांनी हा महत्वाचा मुद्दा निदर्शनास आणला. रेल्वे प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी सरचिटणीस जितेंद्र पाटील यांनी केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email