डोंबिवलीकर अॅड. दिपक साळवी यांची विशेष अभियेाक्ता म्हणून नियुक्ती
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१२ – डोंबिवली पश्चिमेला रहात असलेले ज्येष्ठ वकील अॅड. दिपक साळवी यांची राज्य शासनाने विशेष अभियोक्ता तथा कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे. याबददल डोंबिवलीकरांनी आंनंद व्यक्त केला.
राज्य शासनाच्या उच्च न्यायालय मुंबई व सवोच्च्य न्यायालयात प्रलंबित असणा-या विविध आरक्षण विषयक दाव्यांसाठी नियुक्त सरकारी अभियोक्ता व राज्य शासन यांच्यामधील समन्वयक साधणे व राज्य शासनाला सल्ला देण्यासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राज्य शासनाच्या उच्च न्यायालय मुंबई व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणा-या विविध आरक्षण विषयक दाव्यांमध्येही नियुक्त सरकारी अभियोक्ता व राज्य शासन यांच्यात समन्वय साधणे व सल्ला देण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
तसेच विविध आयोगासमोर राज्य शासनाच्या प्रलंबित दाव्यांसदर्भात राज्य शासनास मार्गदर्शन करणे व राज्य शासनाची बाजू त्या आयोगासमोर खंबीरपणे मांडणे, विविध न्यायालयातील दिलेल्या निर्णयांचा अभ्यास करुन शासनाला वेळोवेळी विविध जातींसदर्भात आरक्षण धोरणाबाबत मार्गदर्शन करणे, शासनाने सोपवलेल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन राज्य शासनाला आवश्यक वाटेल त्या कायदेशीर बाबींसदर्भात अभ्यास करुन मार्गदर्शन करणे अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी पूजा मानकर यांनी ७ ऑगस्ट रोजी ही नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार करण्यात येत असल्याचे त्यात नमूद केले आहे.