डोंबिवलीकरांना मिळणार घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस

डोंबिवली दि.२७ :- कल्याण लोकसभा मतदार संघातील सर्व नागरिकांना महानगर गॅसच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारा घराघरात गॅस पुरवण्याच्या कामाचा शुक्रवारी भूमीपूजनाने शुभारंभ करण्यात आला. वर्षभरापूर्वी डोंबिवली एमआयडीसीपर्यंत आलेल्या गॅसच्या पाईपलाईन निवासी विभागात आल्या आणि घराघरात गॅस पुरवठा सुरू करण्यात आला.

हेही वाचा :- कोपरी पुलाचा पहिला टप्पा पाच महिन्यांत पूर्ण करा एकनाथ शिंदे यांचे आदेश

त्यानंतर डोंबिवली शहरात गॅस पोहोचविण्यासाठी महानगर गॅस कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला होता. परंतु यासाठी केडीएमसीची रीतसर परवानगी मीळत नव्हती. यासाठी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधून यातील सर्व अडथळे दूर करण्यात यश मिळविल्याने सदर भूमिगत पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी संपन्न झाला. या प्रसंगी अनेक मान्यवरांसह नागरीक मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.

हेही वाचा :- खळ्यावरील भाताच्या भाऱ्यात ३ विषारी घोणस शेतकरी कुटुंबाला फुटला घाम

डोंबिवली शहरात घरोघरी पाईपद्वारा गॅस पुरवठा करण्यासाठी मानपाडा रोडवरील शिंदे हॉस्पिटल, घरडा सर्कल, मंजुनाथ शाळा, व्ही. पी. रोड, छेडा रोड मार्गे गणेश मंदिर डोंबिवली रेल्वे लाईनपर्यंत सदर काम करण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात रेल्वे लाईन खालून सदर लाईन डोंबिवली पश्चीम भागात पोहोचणार आहे यासाठी लागणारी रेल्वेची परवानगीही महानगर गॅस कंपनीला मिळाली आहे. त्यामुळे डोंबिवलीच्या पूर्व व पश्चीम परीसरात गॅस पाईपलाईनमार्फत पोहोचून नागरीकांना या सेवेचा लाभ होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email