डोंबिवलीकरांचा विधानभवनावर निघाला मोर्चा …
डोंबिवलीकरांचा विधानभवनावर निघाला मोर्चा …
डोंबिवली :- दि. १९ ( प्रतिनिधी ) डेडीकेटेड फेनट कॉरीडॉर जे. एन. पी.टी. मुंबई ते नवी दिल्ली भारतीय रेल्वेचा मह्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प प्रास्तावित आहे. या प्रल्कपात डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोडवरील साईनाथ नगर येथील साईनाथवाडी येथील बाधीत नागरिकांनी `घराच्या बदल्यात घर`मागणीसाठी बुधवारी नागपूर येथे विधानसभवनसमोर मोर्चा काढण्यासाठी आज मंगळवारी डोंबिवलीतून निघाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पबाधित भेट घेणार असून त्यांच्याकडे न्याय मागणार आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोडवरील साईनाथ नगर येथील साईनाथवाडीयेथील ३०० कुटुंबीय बाधीत या प्रकल्पात बाधित झाले आहे. येथील रहिवाशी गेल्या वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप यथील रहिवाश्यांनी केला आहे. दीड वर्षापासून रेल्वे प्रशासनाने येथील घरांचे सर्वे केला असून प्रत्येक घराला क्रमांक दिला आहे. मात्र घराच्या बदल्यात घर द्यावे अशी मागणी येथील रहिवाश्यांची आहे. यथील येथील रहिवाशी भुजंग कांबळे , अविनाश मोरे आणि रेखा कांबळे यांनी या सरकारला आम्ह्ची काळजी नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. `घराच्या बदल्यात घर` मागणीसाठी बुधवारी नागपूर येथे विधानसभवनसमोर मोर्चा काढण्यासाठी आज मंगळावरी डोंबिवलीतून निघाले आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथील सुमारे २२५ आणि जुनी डोंबिवली येथील १२५ कुटुंबीय या प्रकल्पात बाधित होत आहे. या प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर गेली सात वर्ष रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. प्रशासनाकडून बाधितांच्या नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. या बाधितांना घराच्या बदल्यात घरे मिळवून देण्यासाठी भोईर याचे एका बाजूला प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे या प्रकल्पातील बाधित थेट विधानभवनसमोर मोर्चा काढून सरकारला लक्ष देण्यास भाग पाडणार आहेत.