डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी बसपाने केले अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनी डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगर येथील बहुजन समाज पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश सचिव दयानंद किरतकर यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विन्रम अभिवादन केले. यावेळी त्रिशरण आणि पंचशील सामुहिकरित्या म्हणण्यात आले. यावेळी दयानंद किरतकर म्हणाले , जगाला राज्यघटनेतून विश्वबंधुत्वाची हाक देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६१ व्या महापरिनिर्वाण दिन आहे. बसपाचे प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली दादर येथील चैत्यभूमी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. बहुजन समाज पार्टीच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले. याठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या विचारसरणीच्या पुस्तिकांचे वाटप व पक्षाच्या सदस्यांची नोंदणी करण्यात आली . यावेळी मधुकर बनसोड रवीकिरण बनसोडे , संजीवन इंगळे , संजू पवार, पांडुरंग खैरे , उमेश पवार , सुनील पवार , महेंद्र जाधव , काशीराम कासारे , सुनील चव्हाण आणि सुरेश पवारआदी उपस्थित होते.