डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा १४ एप्रिल पर्यंंत उभारावा अन्यथा पालिकेवर मोर्चा

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा १४ एप्रिल पर्यंंत उभारावा अन्यथा पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

 (श्रीराम कांदु)

डोंबिवली- गेली अनेक वर्ष डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती  पुतळा उभारण्यासाठी प्रशिक सामाजिक संघटनेने ३१ ऑगस्ट २०१५ रोजी धरणे आंदोलन केले होते.या आंदोलनाची दाखल पालिकेने घेतली होती. मात्र त्यानंतर पालिकेने वेळ काढू भूमिका घेतल्याने १२ ऑक्टोबर २०१७ रोजी निषेध मोर्चा काढला होता. नुकतेच संघटनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना निवेदन देऊन येत्या १४ एप्रिल पर्यत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अन्यथा पालिकेवर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.

    

 याप्रकरणी प्रशिक सामाजिक संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जयभीम प्रतिष्ठान, स्वाभिमान रिक्षा चालक – मालक युनियन, बहुजन फळभाजी विक्रेता संघटना, भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्था, संभाजी ब्रिगेड, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी,रिपब्लिकन सेना यांनी मागणी केली आहे . प्रशिक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद साळवे म्हणाले, संघटनेच्या वतीने आंदोलन आणि निदर्शने  करण्यात आली होती.६ डिसेंबर रोजी संघटनेने याठिकाणी प्रतीकात्मक भूमिपूजन केले होते.दोन वर्ष उलटूनहि प्रशासन काहीही हालचाल करत नसल्याचे संघटनेच्या लक्षात आल्यावर पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्याची भेट घेतली होती. महानगरपालिकेच्या मात्र पालिकेने वेळ काढू भूमिका घेतल्याने १२ ऑक्टोबर २०१७ रोजी निषेध मोर्चा काढला होता. आता १४ एप्रिल जवळ आली असताना पालिकेला आश्वासनाची आठवण करून देत १४ एप्रिल पर्यत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अन्यथा पालिकेवर धडक मोर्चा काढू असा इशारा दिला आहे. याबाबत प्रशिक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद साळवे म्हणाले, अनेक वेळेला पालिकेला पत्र दिले आहे.पालिकेने आमच्या मागणीची गांभीऱ्याने दखल घ्यावी. तर संभाजी ब्रिगेडचे डोंबिवली महानगर अध्यक्ष विशाल जाधव म्हणाले, अनेक संघटनेने यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. संभाजी ब्रिगेडचीही मागणी आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email