डॉक्टर बनण्याचं स्वप्न लोकलमधून पडून अपघात रुणालीला मिळाला मदतीचा हात, शिवसेना उचलणार यापुढील खर्च
ठाणे दि.२२ – स्वतंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्टला दुपारी रुणाली मोरे हिचा लोकलमधून पडून अपघातात झाला होता. ज्यामुळे तिला आपले दोनही पाय गमवावे लागले. खाजगी रुग्णालयात उपचार घेणारी अल्पवयीन रुणाली मोरे हिच्या वैद्यकीय खर्चासाठी ती आणि तिचे कुटुंब याचना करीत होते उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणासाठी रूणालिची आई घरकाम करते.
हेही वाचा :- राज्य शासनाच्या विरोधात १० हजार पेक्षा जास्त नागरिक रोष व्यक्त करणार..
तर, वडील हेमंत मोरे हे मिळेल ते रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा आणि दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा गाडा चालवत आहेत. घरची परस्थिती हालाकीची त्यात शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रुणाली मोरे हिचा संपुर्ण खर्च शिवसेना उचलणार असुन भविष्यात रुनालीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शिवसेना खंबीरपणे पाठीशी उभी राहणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.