डॉक्टरांनी रिक्षातच केली महिलेची प्रसूती

अंबाजोगाई – येथील अ‍ॅपे रिक्षातून दीड तासाचा रुग्णालयापर्यंतचा खडतर प्रवास. त्यातच प्रसुतीच्या असह्य झालेल्या वेदना. अशा संकटाचा सामना करीत रुग्ण महिला अंबाजोगाईच्या स्वा. रा. ती. रुग्णालयाच्या परिसरात पोहचताच वेदना असह्य होत असल्याने तिच्या विव्हवळण्याचा आवाज महिला डॉक्टरांच्या कानावर पडला. डॉक्टरांनीही कसलीही तमा न बाळगता. थेट रिक्षाकडे धाव घेत. अडचणीत सापडलेल्या त्या महिलेची प्रसुती रिक्षातच करून तिला दिलासा दिला.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय सामान्य रुग्णांचे आधारस्थान आहे. होळ येथील एक महिला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्याने प्रसुतीसाठी होळ येथून अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रुग्णालयाकडे अ‍ॅपे रिक्षातून निघाली. रिक्षा होळ येथून ११.३० वाजता निघाला. रस्त्यावरील खड्डे, राज्यरस्त्याचे सुरू असलेले काम अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत दीड तासानंतर १५ कि.मी. चे अंतर पार करत रिक्षा रुग्णालय परिसरात आला. रिक्षातील रुग्ण महिला प्रसुतीच्या असह्य वेदनांनी विव्हळत होती. तिला रुग्ण कक्षात घेऊन जाणेही मोठ्या मुश्किीलीचे काम होते. तिला असह्य वेदना होऊ लागल्याने ती जोर-जोरात विव्हळत होती. तिच्या विव्हवळ्याण्याचा आवाज स्त्रीरोग विभागातील निवासी डॉक्टर मिताली गोलेच्छा यांनी ऐकला व त्यांनी तात्काळ रिक्षाकडे धाव घेतली. रिक्षात असलेल्या महिलेची स्थिती पाहून त्यांना त्या महिलेच्या प्रसुतीबाबतची पूर्ण जाणीव झाली. प्रसंगावधान ओळखून त्यांनी आजूबाजूच्या महिला व परिचारिकांना बोलावून त्या महिलेची प्रसुती रिक्षातच केली व त्या महिलेला पुन्हा महिला रुग्णकक्षात दाखल केले. त्या महिलेने मुलीला जन्म दिला असून जन्मलेली मुलगीही गुबगुबीत आहे. स्वा.रा.ती. रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखविलेल्या या तत्पर सेवेबद्दल स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी डॉ. मिताली गोलेच्छा यांचे कौतुक केले.

 तात्काळ उपचार मिळाल्याने अनर्थ टळला 

स्वा. रा. ती. रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या होळ येथील त्या महिलेची अवस्था खडतर रस्त्याच्या आदळ्यामुळे गंभीर झाली होती. अशा स्थितीत होणारी प्रसुती अत्यंत गुंतागुंतीची ठरते. मात्र, स्त्री रोग विभागाच्या निवासी अधिकारी डॉ. मिताली गोलेच्छा यांनी तात्काळ रुग्णसेवा उपलब्ध करून दिल्याने त्या महिलेची गुंतागुंत टळली व पुढील उपचार सोयीस्कर ठरले. अशी माहिती स्त्रीरोग विभागाचे प्रा. डॉ. संजय बनसोडे यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email