डेन्मार्कमध्ये बुरखा आणि नकाब घालण्यावर बंदी

डॅनिश संसदेने गुरुवारी सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणाऱ्या वस्त्रांवर बंदी घातली. बुरखा आणि नकाब यांना कायदेशीरपणे वगळून टाकले. ज्या राजकीय नेत्यांनी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मुल्यांचा प्रश्न उपस्थित केला त्यांना काही बुरखा घातलेल्या स्त्रियांनी आपला पाठिंबा दर्शवला.

बुरखा आणि नकाब बंदीच्या विधेयकाला उपस्थित सदस्यांपैकी ७५ सदस्यांचा पाठिंबा मिळाला तर ३० सदस्यांनी याच्या विरुद्ध मतदान केले. या मतदानाच्या वेळी संसदेचे ७४ सदस्य अनुपस्थित होते.

एक ऑगस्टपासून कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच होणा-या अपराधासाठी 1000 क्रोनर (156 डॉलर्स) दंड आणि चौथ्यांदा याचे उल्लंघन करणाऱ्यास 10,000 क्रोनर (1,568 डॉलर) दंड होईल.

स्थानिक डेन्मार्कने दिलेल्या माहितीनुसार पूर्वीच्या बिलामध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा समाविष्ट होती. परंतु नंतरच्या बिलामध्ये त्याच्यात दुरुस्ती करून ती काढून टाकण्यात आली.

टिकाकारांच्या मते मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी पावलेला हा “बुरखा बॅन” हा अश्या मुस्लिम स्त्रियांना लक्ष्य करत आहे ज्या मुस्लिम स्त्रिया नखशिखांत कपड्यामध्ये स्वतःला झाकून घेतात, ज्या स्वतःच्या चेहऱ्यावर सुद्धा कपड्याचे आवरण घेऊन तो लपवतात. अशा पूर्णपणे बुरखा व नकाब मध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरणा-या स्त्रियांसाठी हा नियम लागू आहे.

फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स, बल्गेरिया आणि जर्मनी यांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावरील आवरणाला बंधने लादली आहेत.

आपल्या राज्यातील गैर-पाश्चात्य स्थलांतरितांना एकत्रित कसे करावे यासाठी डेन्मार्क अनेक दशके संघर्ष करत आहे. २०१५ मध्ये मध्य पूर्व आणि इतर ठिकाणी झालेल्या संघर्षांमुळे शरणार्थी मोठ्या संख्येने येथे स्थलांतरित झाल्यावर येथे संघर्षाला सुरुवात झाली.

द अँटी इमिग्रंट डॅनिश पीपल्स पार्टी हा पक्ष त्या वर्षीच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला आणि आता संसदेत गठबंधन सरकारला पाठिंबा देत आहे.

डॅनिश मुस्लीम पार्टी (डीएएमपी) असल्याचा दावा करीत असलेल्या एका वेबसाइटने इंग्रजी आणि डॅनिश भाषेतील “प्रेस रिलिझ” प्रकाशित केले आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की डेन्मार्क युरोपमधील प्रथम मुस्लिम राष्ट्र असेल.

वेबसाइट असे देखील म्हणते की “मुस्लिम पार्टी डेन्मार्कचा सर्वात मोठा पक्ष असेल – आणि हे लवकरच होईल. एकदा का टर्की युरोपियन युनियनचा सदस्य झाल्यानंतर पहिल्याच दिवशी २० ते ५० वयोगटातील सुमारे दहा लाख मुस्लिम डेन्मार्कला जाऊ शकतात आणि त्या नंतर डेन्मार्क एक मुस्लिम देश असेल. तयार रहा!”

Source- News Bharati

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email