डेंग्यूने घेतला चीमुकलीचा बळी पालिकेचा उपाययोजनांचा दावा कागदोपत्री

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१४ – कल्याण पुर्वेकदिल खडे गोळवली येथे राहणाऱ्या एका सात वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूच्या आजारान बळी घेतला या घटने नंतर जनमानसातून पालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परतीच्या पावसा नंतर शहरात डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, साथ रोग झपाट्याने फैलावत असून डेंग्यू ग्रस्ताचा आकडयाणे हजारी पार केली असताना पालिकेचे आरोग विभाग कागदोपत्री करीत असल्याचे दिसुन येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लेप्टोने मागील ४ महिन्यात ४ बळी घेतले असून डेंग्यूच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. खाजगी आणि सरकारी रूग्णालयात ताप आणि व्हायरल फिव्हर साठी दाखल होणार्या रुग्णाची संख्या वाढत असल्याचे पालिकेतील रुग्णालयाच्या आकडेवारीवरून उघड होत आहे. स्वच्छ पाण्यावर डेंग्यूच्या अळ्या वाढत असून कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसर, मोहल्ला, टीटवाळा, मोहने यासह शहरात ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळले असून शहरात आजमितीला हजाराहून अधिक डेंग्यू ग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत.या रुग्णावर सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच या मोसमातील डेंग्यूने पहिला बळी घेतला आहे.

कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरातील कैलास नगर भागातील सृष्टी सोनवणे या चिमुकलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. साथींच्या आजारांचा फैलाव वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी जावून सर्वेक्षण सुरु करत साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वच्छ्ता अभियान अधिक व्यापक राबवन्यास सुरुवात केल्याचा दावा केला आहे असे असले तरी हि आज हि डेंग्यू चा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याचे वाढत्या आकडेवारीहून दिसून येत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी पालिका प्रशासणाविरोधात नाराजी व्यक्त करत नागरिकांचे जीव जात असताना प्रशासन मात्र कागदोपत्री आकड्यांचा खेळ करीत असल्याचा आरोप केला आहे.

याबाबत नागरिकांनी कित्येक दिवसपासून परिसारमध्ये नियमित कचरा उचलला जात नाही. शिवाय कचऱ्याची विल्हेवाट कशी करावी अशी कोणत्याही प्रकारचा यंत्रणा नाही किंवा नियोजन करतांना दिसत नाहीत. परिसरात ७ ते ८ डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळून आले आहे पण कोणाला त्याची पडली नाही स्वच्छता अभियान मोहीम एक राबविण्यात येते नंतर त्या स्वच्छता अभियानाचे होते काय? स्वच्छता चा पुरस्कार मिळणे साठी दिखावा महापालिका करते. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा काय अधिकार असा सवाल केला तसेच महापालिका प्रशासनाने व महापौर,सभापती, सभागृह नेते आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन त्यांना जाब विचारावा अन्यथा जनप्रक्षोकला सामोरे जावे असा इशर दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email