डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स बनवून देणाऱ्या इसमास अटक

(म विजय)
ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर सर्व सामान्य माणूस एक तर आरटीओ मधे जातो नाहीतर ड्रायव्हिंग स्कूल मधे जाऊन चौकशी करतो , लायसन्स साठी तर प्रथम गाडी शिकणे आले त्यावेळी गाडी शिकल्या नंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढून देण्याची हमी ड्रायव्हिंग स्कूल चालवणारे देतात , नाहीतर नुसत लायसन्स काढायच असेल तर पेपरची मागणी करतात , पेपर मधे काही कमीजास्त असल्यास भरमसाठ पैसे घेऊन पेपर मधे अफरातफर करून लायसन्स काढून देतात , असाच मुलुंड येथे सुनील चौधरी नावाचा इसम “चौधरी ड्रायव्हिंग स्कूल ” चालवतो व ड्रायव्हिंग शिकल्या नंतर अथवा डायरेक्ट लायसन्स काढायचे असल्यास उमेदवाराला तो विनासायास कुठलेही पेपर नसताना ड्रायव्हिंग लायसन्स काढून देतो ,घाटकोपर मुंबई येथे राहणाऱ्या रशीद रफिक खान , राम किशोर लाल , मोहम्मद जुल्फ़िकार यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असल्यामुळे त्यांनी सुनील चौधरी शी संपर्क साधला सुनील चौधरी याने त्यांच्या कडून प्रत्येकी 11000 प्रमाणे 33,000 रुपये घेतले व त्यांना डुप्लिकेट लायसन्स काढून दिले , आपल्याला दिलेले ड्रायव्हिंग लायसन्स हे डुप्लिकेट असून आपली फसवणूक झाल्याचे कळल्या नंतर त्यांनी ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा नोंदविला , ठाणे क्राईम ब्रांचला सुद्धा सुनील चौधरी हा आरटीओचे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स (स्मार्ट कार्ड) बनवून लोकांची फसवणूक करतो अशी खबर मिळाली होती , त्या प्रमाणे त्याचा पाठपुरावा केला असता तो मॉडेला चेकनाका मुलुंड येथे येणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचचे वरिष्ट पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली , त्यांनी त्या प्रमाणे सापळा रचून सुनील चौधरी याला ताब्यात घेतले , त्याच्या प्राथमिक चौकशी केली असता आपण शासकीय नोकर असल्याचे भासवुन लोकांकडून पैसे घेऊन बनावट ड्रायव्हिंग लायसन्स देत असल्याचे कबुल केले , त्याच्या कडे कसून चौकशी केली असता व त्याच्या ड्रायव्हिंग स्कूल वर छापा घातला असता स्मार्ट कार्ड बनवण्या साठी लागणारे तांत्रिक उपकरणे , कोरे 50 स्मार्ट कार्ड , 20 कोरे रबर स्टँम्प , 1 लेसर प्रिंटर , 4 कलर प्रिंटर , 1 लँमीनेशन मशीन , 2 कॉम्पुटर , 1 स्टँम्प बनवण्याची मशीन , आरटीओचे बनावट 253 ड्रायव्हिंग लायसन्स , पोलीस आरटीओ , महसूल अशा विविध आस्थापनांचे एकूण 131 शिक्के , समाज कल्याण अधिकाऱ्याचे ओळखपत्र इत्यादी साहीत्य मिळाले , सुनिल चौधरी हा मुंबई विद्यापीठाचा पदवीधर असून त्याने कॉम्पुटरचा डिप्लोमा केलेला आहे त्यामुळे तो सगळी सर्टिफिकेट हुबेहूब कॉम्पुटरवर बनवत होता , रब्बर स्टँम्प बनवण्या साठी सुद्धा त्याने मशीन आणून ठेवले होते , त्याने आता पर्यंत 700 लोकांना अशी डुप्लिकेट लायसन्स बनवून दिल्याचे कबूल केले ,पहिले तो खोटी कागद पत्र देऊन आरटीओ कडून लायसन्स काडुन ध्यायचा त्यासाठी लागणारे 12 वी पास चे , सर्टिफिकेट , कँरक्टर सर्टिफिकेट तो डुप्लिकेट बनवून देत होता , परंतु दोन वर्षांपासून आर्टीओचे नियम कडक झाले , प्रत्येक सर्टिफिकेटची पडताळणी होऊ लागल्या मुळे त्याला बनावट सर्टिफिकेट देण्यास अडचण होऊ लागली , मग त्याने ठरवल आपण खोट सर्टिफिकेट देण्या पेक्षा आरटिओची खोटी ड्रायव्हिंग लायसन्स दिली तर ते सोप होईल त्या प्रमाणे त्याने सर्व साहित्य जमवून 10 ते 11 हजार घेउन डुप्लिकेट लायसन्स देण्यास सुरुवात केली , त्याच्या सांगण्या प्रमाणे त्याने 700 लोकांना लायसन्स वाटले असले तरी तो आकडा वाढण्याची शक्यता आहे , ज्या ज्या व्यक्तींनी सुनील चौधरी कडून लायसन्स बनवून घेतले असतील त्यांनी ठाणे पोलिसांशी सम्पर्क साधावा व आपले लायसन्स खर आहे की बनावट आहे हे तपासुन पहावे असे आव्हान अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी केले आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email