‘डीजेला परवानगी न दिल्यास विसर्जनही करणार नाही,

सरकारने डीजे सिस्टीमला परवानगी द्यावी, अन्यथा कोणतंही मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार नाही. सरकारचा निषेध करत मंडळं आपला गणपती मांडवातच ठेवतील,’ असा निर्धार मंडळांनी व्यक्त केला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी पुण्यातील गणेश मंडळं एकवटली आहेत. ‘डीजेला परवानगी न दिल्यास विसर्जनही करणार नाही,’ असा इशारा शहरातील मंडळांनी दिला आहे.

पुण्यातील ८० हून अधिक मंडळाच्या शिष्टमंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ध्वनी प्रदूषणाचे कारण देत न्यायालयानं गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास परवानगी नाकारली आहे. हा वाद उच्च न्यायालयातही गेला होता. मात्र, तिथंही गणेश मंडळांना दिलासा मिळाला नाही. उच्च न्यायालयानं स्थगिती कायम ठेवली. मंडळांनी यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. ‘सरकार हिंदूंच्या सणावर गदा आणत आहे. न्यायालयात सरकारनं मंडळांची बाजू योग्य पद्धतीनं मांडली नाही. तसंच, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मंडळांना वेळही देण्यात आलेला नाही, अशी भावना मंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email