‘डिजिटल भारत, सक्षम भारत’चे प्रकाशन
नवी दिल्ली, दि.२१ – ‘डिजिटल भारत, सक्षम भारत’ या डिजिटल इंडिया संग्रहाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रकाशन झाले. जनतेपर्यंत डिजिटल इंडियाचे यश पोहोचवणे हा या मागचा उद्देश आहे. संग्रहात दोन भाग आहेत – ‘डिजिटल प्रोफाइल ऑफ इंडिया’ आणि ‘डिजिटल प्रोफाइल ऑफ स्टेटस ॲण्ड यूटीज्’ ‘डिजिटल प्रोफाइल ऑफ इंडिया’ मध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाचे सखोल विश्लेषण आहे.
हेही वाचा :- डिजिटल इंडिया पुरस्कार
‘डिजिटल प्रोफाइल ऑफ स्टेटस ॲण्ड यूटीज’ मध्ये डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती आहे. डिजिटल समावेशन, डिजिटल सक्षमीकरण आणि डिजिटल दरी कमी करुन डिजिटलदृष्ट्या सक्षम समाज आणि भारताचे ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत रुपांतर हा डिजिटल इंडिया उपक्रमाचा हेतू असून, त्यावर संग्रहात भर देण्यात आला आहे.