डिजिटल दूरसंवाद आणि डिजिटल अर्थव्यवस्था याबाबतच्या सहकार्यावर भारत आणि युरोपियन आयोगामध्ये चर्चा
नवी दिल्ली, दि.२६ – केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री मनोज सिन्हा आणि डिजिटल एकल बाजारपेठेसाठीचे युरोपियन आयुक्त ॲन्ड्रयूस ॲनसिप यांच्यात आज नवी दिल्लीत डिजिटल दळणवळण, डिजिटल अर्थव्यवस्था आणि समाज यावर चर्चा झाली. समाजाच्या सर्व स्तरासाठी, व्यापार आणि सरकारसाठीही डिजिटल दळणवळण आणि तंत्रज्ञान अतिशय महत्वाचे आहे यावर उभय पक्षांनी भर दिला. नव्या आयसीटी सेवा आणि नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विकास आणि स्वीकार यामुळे आर्थिक आणि सामाजिक विकासावर, शाश्वत विकासावर आणि जागतिक सामाजिक आव्हानांची दखल घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठीचे योगदान यावर प्रभावी परिणाम झाला आहे. डिजिटल दूरसंवाद आणि अद्ययावत तंत्रज्ञान क्षेत्रातले सहकार्य अधिक बळकट करुन त्याचा विस्तार करण्यासाठी कटिबद्धतेवर दोन्ही पक्षांनी पुन्हा शिक्कामोर्तब केले.
Please follow and like us: