ठाण्यात ११ मार्चपासून भव्य कृषि महोत्सव ; विविध कार्यक्रमांची रेलचेल

ठाणे –  कृषि विभागातर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान तसेच योजनांची माहिती पोहचविण्यासाठी  जिल्हा कृषि महोत्सव२०१८ चे ११ ते १५ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील उन्नती गार्डन येथील मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी १.०० वाजता होणार असून या महोत्सवाच्या काळात शेती आणि शेतीवर आधारित विविध उद्योगांतील १२० स्टॉल्स असणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे या महोत्सवास ठाणे व परिसरातील मान्यवर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक बांधिलकीने काम करणारे कलाकार देखील भेट देणार आहेत. स्टॉल बुकिंगसाठी आत्मा च्या कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कृषि महोत्सवाच्या काळात  विविध परिसंवाद व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या अशा भव्य स्वरुपाच्या  कृषि महोत्सवात शेतीतील विविध प्रकारचे एकुण १२० स्टॉल असतील. या महोत्सवातशेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, खरेदीदार विक्रेता सम्मेलन तसेच विविध विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध व्याख्याने आणि परिसंवाद

या  परिसंवादामध्ये दिनांक ११ मार्च रोजी  प्राईम मूव्ह सेवापूरवठादार संस्था पुणे यांच्यावतीने अंकुश पडवळे,शिरीष तेरखडकर,यांचे व्याख्यान होईल. १२ मार्च ला प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत चे एल एच चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे उत्तम सहाणे, कृषी संशोधन केंद्र पालघरचे डॉ गभाले, यांच्या उपस्थितीत शेतकरी-शास्त्रज्ञ असा सुसंवाद होईल. यावेळी रत्नागिरी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक भास्कर पाटील, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे डॉ एम बी दळवी, कृषी भूषण शेतकरी शेखर भडसावळे, यांचे देखील मार्गदर्शन होईल.

१३ मार्च रोजी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी खरेदीदार व निर्यातदार यांचे संमेलन होईल. त्याचप्रमाणे तळेगाव दाभाडे चे एच टी सी कंपनीचे सहायक व्यवस्थापक संजय पारडे, व्यवस्थापक रवींद्र देशमुख ,शहापूर चे प्रगतीशील शेतकरी मकरंद चुरी , कृषी भूषण शेतकरी राजेंद्र भट्ट, कृषी विकास अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे, उपविभागीय कृषी अधिकारी जाभूवंत घोडके यांचे व्याख्यान होईल.

१४ मार्च रोजी पुण्याचे निर्यातदार तज्ज्ञ तुषार खारकर, एनएचआरडीएफ शास्त्रज्ञ तुषार आमरे, के के वाघ कृषी महाविद्यालय, नाशिकचे सहाय्यक प्राध्यापक ,कीटकशास्त्र तुषार उगले कृषी सल्लागार अनंत बनसोडे, मृद विश्लेषण व मृदचाचणी अधिकारी डीएस घोलप यांचे व्याख्यान होईल.

१५ मार्च रोजी प्राईम मुव्ह्चे जिल्हा समन्वयक सुकळीकर, सेंद्रिय शेती तज्ज्ञ मनोहर शेते यांचे मार्गदर्शन होईल. दुपारी ३ वाजता कृषी महोत्सवाचा  समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email