ठाण्यात खाजगी शिक्षकांचा हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा खाजगी क्लासेसचे शिक्षक शासनाच्या विरोधात उतरले रस्त्यावर

ठाणे – महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याकरिता कच्चा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यातील काही अटी, नियम हे क्लिष्ठ, जाचक, अन्यायकारक आहेत. या अटी नुसार सर्वसामान्य क्लासेसची फी वाढ होणार आहे. ही सर्व सामान्य पालकांना फी परवडणार नाही. यांचा दुष्परिणाम महाराष्ट्रातील ५०००० पेक्षा जास्त सर्वसामान्य क्लासेसवर होणार आहे. यामुळे जवळ जवळ १० लाख शिक्षक व इतर कर्मचारी बेरोजगार होणार असुन त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. या संबंधी शैक्षणिक विभागाला वारंवार पत्र व्यवहार केला तरी सुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारे दाद दिली नाही. या कारणास्तव शासनाचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात पालक, क्लासचे संचालक बहुसख्य आजि- माजी विद्याथी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ५००० ते ६०००च्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये घरगुती शिकवणी घेणाऱ्या महिला शिक्षकांचा मोठा समावेश होता. महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाण्यात खाजगी क्लासेसचा असा हा भव्य धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या मोर्चामध्ये शासनाचा निषेध करण्यासाठी मोर्चेकरांनी काळया रंगाच्या टोप्या, काळे झेडे, निषेध फलक दाखवून आपला निषेध व्यक्त केला. मोर्चा अत्यंत शांतीप्रिय, शिस्तीत व स्वच्छतेचे भान ठेवून निघाला. तसेच उप जिल्हाधिकारी सौ.वंदना सुर्यवंशी यांच्याकडे शासनाने गठीत केलेली समिती बरखास्त करणे आणि इतर संघटणेच्या सर्व सामान्य क्लास संचालक यांना नविन समितीमध्ये स्थान मिळण्याची मुख्य मागणी करण्यात आली.
तसेच या मागण्यांचा पुन्हा योग्य विचार केला नाही तरभविष्यात या पेक्षा अधिक तिव्रतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येइल. दुसरे आंदोलन हे महाराष्ट्रातील सर्व क्लासचे शिक्षक मिळून मंत्रालयावर धडकणार. यानंतर होणा-या परिणामास शासन जबाबदार असेल असे ठणकावून सांगण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व कोचिंग क्लासेस संघटनेने केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतिष देशमुख, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण,उपकार्याध्यक्ष रविंद्र प्रजापती, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अनिल काकुळते,ठाणे शहर सचिव विनोद हादवे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुदेश आरगोंडा, खजिनदार सुनिल सोनार, उपखजिनदार मिलिंद मोरे, मुलुंड भांडूप विभागाध्यक्ष सुखदेव जाधव, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष शरद बागवे, भरत जगताप, बबन चव्हाण, तावडे, सुभाष माळकर, मनोज यादव,कदम, परेश कारंडे, महिला शिक्षीका सौ. पुर्वा माने, सौ. अंजली आरगेंडा, सौ.सुरेखा पाटील, सौ. भारती देशमुख, सौ. रुपाली सरोदे, सौ. मिनाक्षी काकुळते, इत्यादी उपस्थित होते असे आपल्या प्रसिद्धी पत्रकात सचिव सरोदे यांनी म्हटले आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email