ठाण्यात उड्डान पुलाखाली झाले १०० मि भरधाव वेगात स्केटिंग

(श्रीराम कांदु)

इ.एस.पी.एम. स्पोटर्स आणि रायसा स्केटिंग क्लब आयोजित १०० मि स्पींट स्केटिंग स्पर्धा नितीन कंपनी ते कॅडबरी समोरउड्डान पुलाखाली संपन्न झाली या स्पर्धेकरीता स्थानिक नगरसेविका सौ. रूचीता मोरे परीवहन सदस्य राजेश मोरे आणि ठा.म.पा यांनी विशेष सहकार्य केले.
सकाळी एकुण १४ गटात हि स्पर्धा भरविली गेली. या स्पर्धेकरीता प्रमुख पाहुणे म्हणुन विधीमंडळ वार्ताहार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे तसेच प्रमोद कुलकर्णी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनाछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक दत्ता चव्हाणविभाग प्रमुख विलास मोरे इ. पाहुणे उपस्थित होते.
माझे ठाणेसुंदर ठाणे‘ या कल्पनेतुन उड्डाण पुलाखाली झालेले सुशोभिकरण खूप चांगले झाले आहे. विशेष म्हणजे विविध खेळ येथे खेळले जातात. म्हणुन हि जागा खेळाच्या स्पर्धेला वापरली. स्केटिंगची १०० मि स्पींट स्पर्धा भरधाव वेगात अतिशय सुरेख झाली. अशा स्पर्धा आम्ही वारंवार घेऊ असे आयोजक प्राध्यापक एकनाथ पवळे यांनी सांगितले.
सदर स्पर्धेमध्ये प्रशिक्षक राहूल पंदिरकर यांच्या रायसा संघाला सांघिक विजेतेपद मिळाले. तर स्पीड ट्रक या संघाला उपविजेते पद मिळाले. रिदेय शर्मानिरजहॉ लुबलआरव थारआन्वी सिंघल,आर्यमन कांडूआयूश सिंगअभिनव वाघमारेसाई सातपुतेरूद्र प्रकाशहिमानी भटजहॉन शिंदेकिष्णा पटेलपार्थ कुलकर्णीसायना जाधव इ. खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळविले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठा.म.पारौनक अॅडव्हरटायझींगअंकीत स्पोर्टसनिसर्ग क्रीडा संवाद संस्थास्टार किड्स किंगडम प्रीस्कूल इ. संस्थेने सहकार्य केले. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ई.एस.पी.एम. चे डायरेक्टर प्रदिप महाले व मारूती चव्हाणअजिंक्य हजारे आणि प्रणित मरचंडे यांनी विशेष मेहनत घेतली.
उड्डाणपुलाखालील सदर जागेत खेळाडूंच्या दृष्टीने आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. तरी ठाणेकर नागरीकांनी याचा फायदा घेऊन आरोग्य सांभाळा“ असे आवाहन प्राध्यापक एकनाथ पवळे यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email