ठाण्यात आंदोलकांनी रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले
मराठा क्रांती मोर्चाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज (बुधवारी) बंदची हाक दिली असून सकाळपासून आंदोलक आक्रमक झाले आहे. ठाण्यात आंदोलकांनी रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले. आंदोलक रुळावर उतरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली. पोलीस आंदोलकांना रुळावरुन हटवण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी लोकल ट्रेनवर दगडफेक केल्याचेही वृत्त आहे. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या मुंबई, ठाणे बंदचा फटका बुधवारी लोकल गाड्यांनाही बसला. जोगेश्वरी स्थानकात आंदोलक रेल्वे रुळांवर उतरल्याने काही वेळेसाठी पश्चिम रेल्वेवरील वाहतूक खोळंबली. मात्र, अवघ्या काही वेळेतच पोलिसांनी आंदोलकांना रुळावरुन हटवले असून आता पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.
Please follow and like us: