ठाण्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण केंद्राला भीषण आग
ठाण्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण केंद्रात भीषण आग लागली. ही घटना रात्रीच्या सुमारास लागली. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी त्वरीत रवाना झाल्या. आगीचे कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता. ठाण्यातील सावरकर नगर येथे वीज वितरणचे केंद्र आहे. केंद्रात अचानक आग लागली. ती लगेच भडकली. या आगीमुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा त्वरीत बंद करण्यात आला.
Please follow and like us: