ठाण्यातील प्रतिष्ठित एन. टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात..४० व्या वर्षात पदार्पण.
( म विजय )
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने एन. टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उघाटन स्पोर्टींग क्लब कमिटीचे अध्यक्ष सदानंद केळकर हस्ते झाले. या प्रसंगी स्पर्धेचे संयोजक केळकर, आंतरराष्ट्रीय अंपायर पिलू रिपोर्टर, ऍड. प्रधान, व्यवस्थापक बाळा खोपकर आदीजण उपस्थित होते. सिंघानिया विरुद्ध वसंत विहार यांच्यात सुरुवात झाली.
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी ट्रॉफी होण्यासाठी प्रशासन, क्रीडा प्रेमी, राजकीय प्रतिनिधी यांची ईच्छाशक्ती असणे आवश्यक असून मी अनेक वर्ष याबाबत एक खेळाडू म्हणून व स्पर्धेचा संयोजक या नात्याने पाठपुरावा करत आहे असे आमदार संजय केळकर यांनी सांगून दर्जेदार सामने होतीलच याबाबत विश्वासही व्यक्त केला. स्पर्धेत ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर इ. भागातील १६ संघ सहभागी झाले आहेत. सहभागी संघाकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही.
आमदार संजय केळकर अध्यक्ष असलेल्या या स्पर्धेचे वैशिष्ठ म्हणजे या चाळीस वर्षात १५० च्या वर ‘अ’ दर्जाचे खेळाडू तयार झाले असून आज ते उत्तम क्रिकेट खेळत आहेत. या स्पर्धेतून आज पर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रणजी, राज्य पातळीवर २८ खेळाडू पुढे आले आणि विविध स्तरावर चमकले. अजिंक्य राहणे, निलेश कुलकर्णी, अभिजित काळे, अविष्कार साळवी, शोएब शेख, सागर पवार, मिलिंद ताम्हाणे, संग्राम बागुल, मयुरेश कद्रेकर अशा अनेक खेळाडूंनी स्पर्धेत नावलौकिक प्राप्त करतानाच त्यात सातत्य राखून नवीन खेळाडूंना प्रोत्साहन व संधी देण्याचा प्रयत्न करून ठाणे जिल्ह्यात क्रिकेटचा खेळ पुढे नेला आहे. स्पर्धेसाठी केळकर कुटुंबियांकडून वेळोवेळी भरघोस मदत करून मोठा हातभार लावला आहे.