ठाण्याच्या कासारवडवली परिसरात लिफ्टमध्ये हात अडकल्यामुळे चिमुरडीने आपला हात गमावला
ठाणे – ठाण्याच्या कासारवडवली परिसरात लिफ्टमध्ये हात अडकल्यामुळे एका आठ वर्षांच्या मुलीला आपला हात गमवावा लागला. दोन दिवसांपूर्वी अर्चना शिकवणीसाठी गेली होती. त्यावेळी तळमजल्यावर पडलेलं पेन घेण्यासाठी अर्चना लिफ्टने खाली गेली. परत आल्यानंतर अर्चनाची चप्पल लिफ्टमध्येच राहिली. ती घेण्यासाठी तिने लिफ्टमध्ये हात घातला. मात्र त्याचवेळी लिफ्टचा दरवाजा बंद झाला. लिफ्टच्या दरवाज्यात हात अडकल्यामुळे अर्चनाचा हात कोपरापासून तुटला. तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लिफ्टमध्ये शिरताना किंवा बाहेर पडताना काळजी घेतली नाही, तर काय घडू शकतं हे सागता येत नाही. म्हणून काळजी पूर्वक असल्या वस्तुचा वापर करवा.
Please follow and like us: