ठाणे शहरात एका नऊ वर्षीय मुलाचा शौचालयाजवळील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

ठाणे – शुक्रवारी सायंकाळी शौचालयाजवळील पाण्याच्या टाकीत पडून एका नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कळवा येथील महात्मा फुले परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळील घडली. कुणाल सुरेश बागूल (९) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो कळव्यातील महात्मा फुलेनगरमधील साईनाथनगर भागात राहत होता. शौचालयाजवळील पाण्याच्या टाकीतून पाणी घेताना त्याचा तोल जाऊन तो टाकीत पडला. टाकीची खोली जास्त असल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर सफाई कामगार तिथे आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परिसरातील रहिवाशांनी महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email