ठाणे येथे ९ डिसेंबरला राष्ट्रीय लोक न्यायालय

(श्रीराम कांदु  )

जिल्हा व सत्र न्यायालय ,ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये कौटुंबिक न्यायालये,कामगार न्यायालय सहकार न्यायालय येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय ग. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले आहे.

या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फोजदारी स्वरूपाची , १३८ एन. आय. ऍक्ट (चेक संबधित) अनव्ये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे , कॊटुंबिक वाद प्रकरणे, महसुली प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व पक्षकारांना आवाहन करण्यात येते आहे कि , या संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा . तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे,किंवा तालुका विधी सेवा समिती यांचे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

 सर्व पक्षकारांना सूचित करण्यात येते कि आपणास राष्ट्रीय लोकअदालती बाबत कोणतीही समस्या असेल व इतर चौकशी करायची असल्यास खालील क्रमांकावर करावी . वाशी ,नवी मुंबई ०२२-२७५८००८२, भिवंडी ०५२२-२५३२५०, कल्याण ०२५१- २२०५७७० , मुरबाड ०२५२४ -२२२४३३ , शहापुर ०२५२७ -२७२०१६, उल्हासनगर ०२५१- २५६०३८८ ,पालघर ०२५२५-२५६७५४, वसई ०२५०-२३२५४८५, वाडा ०२५२६-२७२६७२, डहाणु ०२५२८-२२२१६०, जव्हार ०२५२०-२२२५६५ पक्षकारांनी  सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर,ठाणे येथे प्रत्यक्ष येऊन किंवा फोन नं . ०२२-२५४७६४४१ द्वारे संपर्क साधावा , आणि या महालोकअदालतीचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,ठाणे यांच्याकडून करण्यात आले आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email