ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता,व् मंत्रीमंडळाच्या अन्य निर्णय

( महेश शर्मा )

ठाणे-भिवंडी-कल्याण मुंबई मेट्रो मार्ग 5 ला मान्यता:
एकूण लांबी : 24.9 कि.मी
एकूण स्थानके : 17
प्रकल्प किंमत : 8416.51 कोटी रूपये
प्रकल्प कालावधी : मार्च 2021

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी विशेष उद्देश वाहन स्थापन्यास मान्यता:
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी स्वतंत्र कंपनी
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड
51 टक्के भागभांडवल एमएसआरडीसीकडे
समृद्धी महामार्गाच्या कामाला गती येणार

 

शासकीय दूध योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष योजना:

दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजनांचे पीपीपी तत्वावर पुनरूज्जीवन
आरे ब्रँडची जोपासना, विक्री केंद्रांना अधिक सुविधा, मॉल्समध्ये विकण्याची मुभा
पीपीपी तत्त्वावर पुनरूज्जीवनासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्यासही मान्यता
शेतकर्‍यांना जोडधंदा मिळणार, मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती

स्वामी समर्थनगर-जोेगेश्वरी-विक्रोळी मुंबई मेट्रो 6च्या डीपीआरला मंजुरी:

एकूण लांबी : 14.47 कि.मी
एकूण स्थानके : 13
प्रकल्प किंमत : 6716 कोटी रूपये
प्रकल्प कालावधी : मार्च 2021
स्वामी समर्थनगर, जोगेश्वरी, विक्रोळीचे उपनगरीय रेल्वेशी एकात्मिकीकरण

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी उच्चतम बोलीधारक मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट्स लि. (एमआयएएल) यांची निवड
पीपीपी धर्तीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास
डिसेंबर 2019 पर्यंत काम पूर्ण करणार


नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने:

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी

 

अन्नप्रक्रिया धोरण लागू करण्यास मंजुरी :

कृषिप्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी दोन स्वतंत्र संचालनालय
उद्योगांच्या मंजुरींसाठी एक खिडकी प्रणाली
कृषी बाजारपेठेसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण
शेतीगटांतून दर्जेदार कच्चामाल उपलब्ध करून देणार
खाजगी क्षेत्राच्या सहकार्यातून लॉजिस्टिक सुविधांचे निर्माण
सूक्ष्म, लघु, मध्यम प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य
विद्युत शुल्कात सवलती, कौशल्य विकासावर भर
अन्न प्रक्रिया उद्योगांत महिलांना प्राधान्य

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email