ठाणे पनवेल वाशी लोकल फे-या ३० जानेवारीपासून वाढणार

ठाणे -ठाणे ते वाशी-पनवेल या फे-या येत्या ३० जानेवारीपासून वाढणारआहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा तसेच ठाणे पूर्वेस चढणा-या व उतरणा-या अशा दोन्ही सरकत्या जिन्यांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, सुरेश व्ही. नायर, स्टेशनमास्तर एस.महिदर आदी उपस्थित होते. ठाणे ते वाशी-पनवेल या वाढीव फेयांचा शुभारंभ केला असून या फे-या येत्या ३० जानेवारीपासून सुरू होणार असल्याचं यावेळी जाहिर करण्यात आले.

ठाणे रेल्वे स्थानकातून सुटणा-या गाड्या  लोकल वेळ
ठाणे ते पनवेल सकाळी ९:१४
ठाणे ते नेरूळ दुपारी ३ : ०५
ठाणे ते वाशी दुपारी ३ : ५२
ठाणे ते पनवेल सायंकाळी ६ : १०
ठाणे ते नेरूळ दुपारी ५ : १६
ठाणे ते वाशी दुपारी ४ : १९
ठाणे ते पनवेल रात्री ९ : ३६
ठाणे ते नेरूळ रात्री ८ : २०
नेरूळ ते ठाणे रात्री ८ : ५८

नेरूळवाशी पनवेल स्थानकातून सुटणा-या गाड्या

लोकल वेळ
पनवेल ते ठाणे सकाळी ८ : १५
नेरूळ ते ठाणे दुपारी ३ : ४५
वाशी ते ठाणे दुपारी ३ : ११
पनवेल ते ठाणे सकाळी १० : १२
नेरूळ ते ठाणे दुपारी ५ : ५४
वाशी ते ठाणे दुपारी ४ : ३१
पनवेल ते ठाणे सायंकाळी ७ : १८
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email