ठाणे ते कल्याण रेल्वे प्रवासादरम्यान महिलेने ट्रेन मध्ये दिला गोंडस जुळ्यांना जन्म

डोंबिवली दि.१५ – आई वडिलांसोबत विशाखा पट्टनम एक्स्प्रेस ने आपल्या माहेरी निघालेल्या एका गरोदर महिलेला ठाणे स्थानक येताच प्रसूती वेदना सुरू झाल्या तिने ठाणे ते कल्याण दरम्यान एक मुलगी व एकामुलाला जन्म दिला. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर चे पथक व आरपीएफ ने कल्याण रेल्वे स्थानकावर धाव घेत ट्रेंन येताच तात्काळ या बोगी मध्ये जाऊन महिलेवर उपचार करत अर्ध्या तासात या महिलेसह तिच्या दोन मुलांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. महिलेसह तिच्या बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घाटकोपर येथे राहणारी तबसुम शेख ही गरोदर महिला आज सकाळी आपल्या आई वडीलसोबत आपल्या माहेरी सिकंदराबाद येथे विशाखा पट्टणम एवस्प्रेस ने जात होती. मात्र सात वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक येताच तिला प्रसूती वेदना सुरू झाली. थोड्याच वेळात 7 वाजून 35 मिनीटांनी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला .त्यानंतर ट्रेन कल्याणच्या दिशेने जात असताना 15 मिनीटांनी 7 वाजून 50 मिनीटांनी पुन्हा एका गोंडस मुलाला जन्म दिला. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांचा पथकासह आरपीएफ जवानांनी कल्याण रेल्वे स्थानकावर धाव घेत ट्रेन येताच तत्काळ त्या बोगीत जाऊन महिलेवर उपचार करत अर्ध्या तासात महिलेला कल्याणच्या रुक्मिणीबाईं रुग्णालयात दाखल केले या महिलेसह तिच्या दोन्ही मुलांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email