ठाणे जिल्ह्यात ९ लाख रोपे लावली

(श्रीराम कांदु)

ठाणे दि.०५ – १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेस ठाणे जिल्ह्यात उत्साहाने प्रारंभ झाले असून ५ दिवसांत सुमारे ९ लाख रोपे लावली आहेत, जिल्ह्याला यंदा ३२ लाख ३९ हजार १३४ रोपे लावण्याचे उद्दिष्ट्य आहे अशी माहिती उप वन संरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

वन विभागाने आत्तापर्यंत ६ लाख १३ हजार ६८५ तर महानगरपालिका, नगर परिषदांनी मिळून २५ हजार ८१२ रोपे लावली आहेत.

इतरांची आकडेवारी पुढीलप्रमाणे

सामाजिक वनीकरण २५ हजार ९०१, ग्राम विकास १ हजार ३८१, शैक्षणिक संस्था १ हजार 51, कृषी विभाग १३ हजार ९६७, सार्वजनिक आरोग्य ४ हजार १०३, वित्त विभाग १ हजार ,इतर कार्यालये आणि विभाग ४४ हजार.

वरप येथे ज्या ठिकाणी या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ झाला तिथे २२ हजार झाडे लावण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी व्यक्ती, संस्था, सोसायट्या, सामाजिक संघटना , महाविद्यालये पुढे येऊन उत्साहाने वृक्ष लागवड करीत असल्याचे चित्र आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email