ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या ७६.९७ टक्के पाऊस भातसाही भरू लागले

ठाणे दि.१८ – ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७६.९७ टक्के पाउस झाला असून धरणांमध्ये देखील पुरेसा पाणीसाठा झाला आहे. तानसा धरणाचे दरवाजे काल उघडून विसर्ग सुरु झाला आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्याची प्रक्रिया होईल. सध्या हे धरण ७२.६२ टक्के इतके भरले आहे.

मोडकसागर धरणाचे ५ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे दोन दिवसांपूर्वीच उघडण्यात येऊन त्यातून विसर्ग सुरु झाला आहे. सध्याचा धरणसाठा आणि मागील वर्षी याच सुमारास असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे: भातसामध्ये ७२.६२ टक्के(७१.५४ टक्के), मोडकसागर १००.०१ टक्के, ( १०० टक्के), तानसामध्ये ९९.१० टक्के ( ९७.२३ टक्के), बारवीमध्ये ९३.३५ टक्के (७९.३८ टक्के) पाणीसाठा आहे.

उल्हास नदीवरील बंधाऱ्यांची पाणीपातळी

बदलापूर बंधारा धोका पातळी १७.०० असून आजची पातळी १४.२०

मोहने बंधारा धोका पातळी १०.०० असून आजची पातळी ७.१०

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email