ठाणे जिल्ह्यातील दाभाडे , धसई प्राथमिक आरोग्य केंद्राना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र
( श्रीराम कांदु )
ठाणे दि १० नोव्हेंबर : ठाणे जिल्ह्यातील दाभाडे ,धसई प्राथमिक आरोग्य केंद्राना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचा राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन प्रमाणपत्राचा (National Quality Assurance Standard) मान मिळाला आहे.
आरोग्य सेवेत गुणवत्ता पूर्ण सेवा मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय गुणवत्ता कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामध्ये आरोग्य केंद्राच्या विविध निकषांवर मानाकन देण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र दाभाडेला ९५ टक्के गुण मिळाले तर प्राथमिक केंद्र धसईला ९१ टक्के गुण मिळाले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकीय अधिकारी व इतर कर्मचारी तसेच जिल्हा आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन मानाकनांसाठी आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनवणे , यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेखा चिंचोलीकर, डॉ. महेश नगरे , डॉ. प्रेरणा आवटे , डॉ. श्रीधर बनसोडे , डॉ. तरुलता धानके , डॉ. अर्चना गरुड , डॉ. योगेश पाटील , डॉ. होनाराव पाटील , डॉ. अश्विनी त्रिपाठी , डॉ. प्रशांत खरात , डॉ. मिलिंद चित्रे , तसेच सबंधित संस्थेच्या वैदकीय अधिकारी , व इतर कर्मचारी यांनी सर्व तपासणी प्रक्रीयेमध्ये सक्रीय सहभाग घेतला.