ठाणे जिल्हा परिषदेच्या “माझी कन्या भाग्यश्री” योजनेसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

( श्रीराम कांदु )

३१ ऑक्टोबर पर्यंत नावनोंद करण्याची संधी

ठाणे दि 24 ऑक्टोबर : ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला वं बाल विकास विभागाच्या वतीने माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत बाल विकास विभाग ठाणे जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृह , दुसरा माळा , स्टेशन रोड , ठाणे (प ) येथे प्रत्येक्ष भेट देऊन अथवा ०२२-२५३६९१२२ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करण्याचे आवाहन महिला बाल वं विकास अधिकारी संतोष भोसले यांनी केले आहे.

निबंध , घोषवाक्य , लघुपट , चित्ररथ ,या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी ३१ ऑक्टोबर पर्यंत सबंधित पत्त्यावर साहित्य जमा करायचे असून वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी नांवनोंद केल्यावर अंतिम स्पर्धेची तारीख कळवण्यात येणार आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email